Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकLeopard Attack News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Leopard Attack News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या वस्तीवर रात्री १२ वाजेच्या सुमारास गोठ्यात शिरून वासरावर (Calf) हल्ला केला. यात जागेवर बिबट्याने (Leopard) वासराला फाडून आपली भूक भागविली. त्यांमुळे मळ्या, वस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने सकाळी घटनास्थळी जाऊन हल्ला केलेल्या वासराचा पंचनामा केला आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात दिंडोरी तालुक्यात वनारवाडी येथे तरुणीवर हल्ला करून ठार केले. तर दिंडोरी जाधव वस्ती येथे चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतला असताना वनविभाग बिबट्या संदर्भात कार्यक्षम दिसत नाही. वनविभागाने तालुक्यातील ज्या गावामध्ये बिबट्याचे प्रमाण अधिक आहे, आशा गावामध्ये जाऊन जनजागृती करणे आवश्यक असताना वनविभाग (Forest) असे करताना दिसत नाही.

YouTube video player

दरम्यान, हल्ला (Attack) झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवर जणू आमंत्रण दयावे लागते अशी परिस्थिती सध्या वनविभागाची आहे. ज्या गावामध्ये बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे आशा गावांसाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवून त्या गावांमध्ये पिंजरे (Cage) नेऊन ठेवले पाहिजे किंवा त्या गावासाठी पिंजरे राखीव ठेवले पाहिजे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये वनविभाग गाफील असल्याचे चित्र तालुक्यात आहे. त्यामुळे असे किती बळी बिबट्याने घेतल्यानंतर वनविभाग ॲक्शन मोडवर येणार अशी चर्चा तालुक्यात होत आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...