Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या...अन् बिबट्या चढला नारळाच्या झाडावर

…अन् बिबट्या चढला नारळाच्या झाडावर

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील सांगवी गावातील (Sangvi village) धनगरवाडी (Dhangarwadi) रस्त्यावरील दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर (coconut tree) एका बिबट्याचा (Leopard) पाठलाग करतांना दुसरा बिबट्या चढतानांची घटना त्याच वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर आज सकाळी चित्रीत केली आहे.

- Advertisement -

या परिसरात बिबट्यांचे नेहमीच दर्शन होत असते. मात्र, दोन बिबट्यांची अशी झटापट पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धनगरवाडी सोमठाणे (Somthane) हा रस्ता रहदारीचा असून परिसरात अनेक शेतकऱ्यांची घरे रस्त्यांवरच आहे.

दरम्यान, या परिसरात एक अंगणवाडी असून अंगणवाडीतील मुलेही याच रस्त्याने नेहमी ये-जा करत असतात. त्यामुळे एखाद्या मुलावर किंवा नागरिकावर हल्ला करण्यापूर्वीच परिसरात पिंजरा (Cage) लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या