Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदेवळाली परीसरात बिबट्याचे दर्शन

देवळाली परीसरात बिबट्याचे दर्शन

देवळाली कॅम्प | Deolali Camp

दारणा किनाऱ्यावर असलेल्या संसरी येथील भैरवनाथ मंदीरा लगतच्या नाल्याजवळ रात्री ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या दिसून आला.

- Advertisement -

सकाळी सरपंच विनोद गोडसे व ग्रामपंचायत अधिकारी यांनी वनविभागास याबाबत माहीती दिली असून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली आहे. या शिवाय भगूर-लहवीत रस्त्यावर असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा पंप हाऊस जवळ बिबट्याचे वास्तव असल्याने कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दारणानदी पात्रालगत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्या ना राहण्यासाठी हक्काचे घर मिळत आहे. उसाची तोडणी होऊन गेल्याने बिबटे सैरभैर झाले असून ते नाले व दाट झाडी झुडपात वास्तव करीत आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याने अनेकदा दर्शन देत काही पाळीव प्राण्यांचा फ़डशाही पाडला आहे.

लहवीत, वंजारवाडी, भगूर, राहुरी दोनवाडे, नानेगाव, शेवगेदारणा या गावांलगत बिबट्याने गेल्या पाच वर्षात तीन ते चार बालकांचा बळी तर अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पडला आहे. साऊथ देवळाली परिसरात लष्करी जंगलात जंगल बचाव मोहिमेअंतर्गत बिबटे सोडले जातात.

पाणी व भक्षाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हे बिबटे नागरी वस्तीकडे आपला मोर्चा वळवितात. फेब्रुवारी नंतर हे प्रमाण वाढत असते. काल देखील भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट संसरी ते शेवगे दारणा रस्त्यावर येऊन दर्शन दिल्याने नागरिका मध्ये घाबराहठ निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या