Thursday, May 2, 2024
Homeजळगावजैन हिल्स परिसरात बिबट्याचा संचार

जैन हिल्स परिसरात बिबट्याचा संचार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव शहरापूसन काही अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स्मधील पार्किंगच्या परिसरात

- Advertisement -

बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की 28 रोजी रात्री 1. 30 ते 1.45 रात्रीच्या सुमारास परिसरात सन्नाटा असतांना अचानक बिबट्याने प्रवेश केला.

जवळच असलेल्या सुरक्षारक्षक सुनील काशिनात चौधरी यांना हा बिबट्या दिसला. सुदैवाने कोणताच कर्मचारी वाहनतळावर फिरकतांना बिबट्याला आढळून आला नाही तर बिबट्याने त्याच्यावर हल्लाच चढवला असता.

हा बिबट्या जैन हिल्स व जैन व्हॅली च्या एकूण 1250 च्या एकरमध्ये या बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. तो अधूनमधून कर्मचार्‍यांना दिसत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याचा व्हीडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या