Monday, May 6, 2024
Homeधुळेसर्वांनी मिळून प्लास्टिक कचरा दूर करु या

सर्वांनी मिळून प्लास्टिक कचरा दूर करु या

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

सर्वांनी मिळून प्लास्टिक कचरा (Plastic waste) दूर करु या. झाडे वाचवा (Save the trees) सर्व सांगतात, तेवढेच प्लास्टिक पासून सागर वाचविणे महत्त्वपूर्ण असून त्यासाठी सर्वत्र आपण हे अभियान (campaign) राबवित आहोत. प्लास्टिकचे विघटन (Degradation of plastics) होत नाही, त्याच्यावर प्रक्रिया व्हावी. तसेच आपण सर्वानी प्लास्टिक वापरलेच नाही व प्लास्टिक इतरत्र फेकलेच नाही तर ही फारच आनंदाची बाब असेल. टप्प्याटप्प्याने पूर्णपणे प्लास्टिक बंदी (Plastic ban) करु या, प्लास्टिक कचरा दूर सारु या, असे आवाहन पुणे येथील सागरमित्र अभियानाचे (Sagarmitra Mission) विनोद बोधनकर (Vinod Bodhankar) यांनी केले.

- Advertisement -

प्लास्टिक बंदी व रिसायकलिंगबाबत शिरपूर येथे आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल मध्ये मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सागर मित्र अभियान पुणेचे विनोद बोधनकर यांचे मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर शहर व तालुक्यात शंभर टक्के प्लास्टिक बंदी होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाला विनोद बोधनकर, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, सौ. रीटा पटेल, शिरपूर एजुकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, किसान विद्या प्रसारक संस्था सचिव निशांत रंधे, कैलासचंद्र अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, जिल्हा बँक संचालिका सौ. सिमा रंधे, संगीता देवरे, गिरीष पाटील, बिरारी, विशाल सोनकुळ, न.पा. मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकिय अधिकारी संजय हासवानी, अभियंता माधवराव पाटील, सीईओ डॉ. उमेश शर्मा आदी उपस्थित होते.

विनोद बोधनकर पुढे म्हणाले की, सर्वत्र प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन सर्वत्र व कुठेही प्लास्टिक फेकले जाते. आपण वापरलेले प्लास्टिक जपून ठेवून विविध प्रक्रियेसाठी द्यावे. प्लास्टिक निर्मिती जगभर होत असल्याने समुद्र, नदीचे चित्र बदलत आहे. नदीत आता मासे, जीव, प्राणी जास्त प्रमाणात नाहीत हे कशामुळे? बोटिंग करतांना अनेक बाबी लक्षात येतात. काळ्या रंगाचे पाणी व पाण्यात प्लास्टिक जास्त प्रमाणात आहे.

आळंदी, पंढरपूर कुठेही गेलो आपण की पाण्याच्या प्रवाहासोबत प्लास्टिक दिसते. आता विद्यार्थ्यानी तसेच स्वयंसेवी संस्थानी यासाठी पुढाकार घ्यावा. काही दिवसांचे एकत्रित केलेले प्लास्टिक घरून आणून शाळेत व नेमून दिलेल्या ठिकाणी जमा करावे. तिथून प्रक्रिया करण्यासाठी व नवीन वस्तू निर्मितीसाठी पाठविले जाईल. सागरमित्रमार्फत अनेक स्तरावर कार्य केले जाते. आपण प्रत्येकाने या सेवाभावी कार्याला स्विकारले पाहिजे.

यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, जळगाव येथील विनोद बियाणी, तस्नीम जळगाववाला, रीशा पटेल, डॉ.उमेश शर्मा, डॉ. वैशाली पाटील, विशाल, निलेश चोपडे, मुख्याध्यापक कुलकर्णी, एम.के.भामरे, अनिल जाधव व अनेकांनी चर्चेत सहभाग घेतल्याने उपस्थितांच्या शंकांचे समाधान झाले.

प्रास्ताविकात सौ. पौर्णिमा पाठक यांनी द्वेता पटेल यांच्या विविध उपक्रमांसह कापडी पॅड वाटप, मोफत मोतिबिंदू शिबीर, मोफत चष्मे वाटप, विविध मार्गदर्शन शिबीर, परस बाग, सेंद्रिय भाजीपाला उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सुप्रिया पंतवैद्य यांनी करून दिला. आभार पौर्णिमा पाठक यांनी मानले. शेवटी इतनी शक्ती हमे देना दाता ही प्रार्थना सर्वानी म्हणून कार्यक्रम समारोप झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या