Friday, May 3, 2024
Homeराजकीयबिहारमध्ये लव जिहादविरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू

बिहारमध्ये लव जिहादविरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू

दिल्ली | Delhi

भाजपा शासित काही राज्यांमध्ये लव जिहादच्या घटना आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देतांना शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी म्हंटल आहे की, “विकास हाच निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, लव जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचं स्वागत करतो. महाराष्ट्रात कायदा कधी होणार असं काही नेते म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे. राज्यातील काही भाजपाचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात कायदा कधी होणार? माझी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या विषयावर आम्ही इतकं सांगू की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू.” असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. करोना संक्रमण वाढत असताना भाजप विविध मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. यावर राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. भाजपचं आंदोलन करोना रोखण्यासाठी आहे की, वाढवण्यासाठी? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, राज्यात ‘लव जिहाद’ नव्हे, तर कोरोना मुख्य संकट असल्याचंही राऊत यांनी यावेळी म्हटलं. यावेळी संजय राऊत यांना राज्यातील वाढीव वीज बिलांविषयी विचारलं असता यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘लव्ह जिहाद’ हा भाजपानिर्मित शब्द; मुख्यमंत्री गेहलोत यांची टीका

बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय – असदुद्दीन ओवेसी

चर्चेत असलेल्या लव जिहाद प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. खासदार ओवेसी यांनी म्हंटल आहे कि, “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी (भाजपा) घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही.” तसेच “बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या