Friday, September 20, 2024
Homeभविष्यवेधघरातील दिशा दोष करा दूर

घरातील दिशा दोष करा दूर

वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे. स्वयंपाकघरात काही दोष असल्यास आरोग्यावर परिणाम होतो. आज जाणून घेऊया काही वास्तू टिप्स ज्यामुळे तुमच्या वास्तुतील असे दोष दूर होतील.

- Advertisement -

वेळेशी संबंधित उपाय

* नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा. जर तुम्ही आपल्या दरवाजाच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा.

* ताणतणाव, चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवा.

* आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायर्‍या किंवा स्वच्छतागृह नसावा याची काळजी घ्या. जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो.

तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून ठरतो.

झाडांशाी संबंधित उपाय

* वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.

* तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडरचं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणावरहीत उपाय आहे.

* जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीची वनस्पती लावा

बेडरूमचं रहस्य

* आपलं बेडरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावं. यामुळे मानसिक आणि शारीरिक दोघांसाठी योग्य वातावरण असेल. कधीही आपली झोपण्याची खोली उत्तर किंवा पूर्व दिशेने नसावी, कारण वास्तुनुसार वाईट आत्मा सरळ तुमच्या घरात प्रवेश करू शकतो.

* दक्षिण दिशेला डोकं करून झोपा, कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल.

* चुकीच्या आकाराच्या अंथरुणाचा वापर करू नये, यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ शकतो.

* कधीच तुमचं अंथरूण बाथरूमच्या दरवाजा समोर नसावं, यामुळे झोपण्याच्या खोलीत नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.

* स्वयंपाक घरासंबंधी उपाय

* अन्न ही मूलभूत गरज असून यामुळे एखाद्या जीवाचं आरोग्य सुदृढ राहतं. दक्षिण-पश्चिम दिशा आपल्या स्वयंपाकगृहासाठी अचूक आहे.

* आपल्या मतानुसार आपण स्वयंपाक गृहाची दिशा बदलवू शकत नसाल तर, अग्नि देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपला गॅस, शेगडी पूर्व दिशेने ठेवा.

* स्वयंपाकगृह आणि बाथरूम एकाच भिंतीला लागून नसावे याची दक्षता घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या