Tuesday, January 6, 2026
Homeक्रीडाLionel Messi: मेस्सीला भेटणाऱ्यांची गर्दी, पण आला आणि ५ मिनिटांत परतला; चाहत्यांची...

Lionel Messi: मेस्सीला भेटणाऱ्यांची गर्दी, पण आला आणि ५ मिनिटांत परतला; चाहत्यांची निराशा, खुर्च्या, बाटल्या फेकल्या

कोलकाता | Kolkata
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. कोलकात्यात पहिल्या दिवशी त्यांनी आपल्या ७० फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीला भेटण्यासाठी हजारो चाहते पोहोचले होते, सुरवातीला कार्यक्रम सुरळीत पार पडला, पण खराब नियोजनामुळे त्याला लवकर परतावे लागले. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.

चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते लिओनेल मेस्सी केवळ ५ मिनिटांसाठी स्टेडियममध्ये आला आणि लगेच परत गेला, ज्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममध्ये जमलेले चाहते खूप संतापले, हिंसक झाले. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये बाटल्या, बेल्ट आणि खुर्च्या फेकल्या, तसेच होर्डिंग्जची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला.

- Advertisement -

खुर्च्या, बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला
मेस्सीला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला भेटण्याची आशा लावून बसले होते, पण चाहत्यांची गर्दी पाहून मेस्सीला स्टेडीममधून बाहेर पडावे लागले. तो थेट हॉटेलच्या दिशेने रवाना झाला. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तासनतास स्टेडीयमध्ये उभे असलेल्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

YouTube video player

मेस्सी ५ ते १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. एवढा पैसा आणि वेळ वाया गेला. आम्ही काहीही पाहू शकलो नाही असे चाहते म्हणत आहेत. इतकेच नाही तर चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला आहे. चाहते आत घुसून स्टेडियमचे नुकसान करत आहेत. याचे व्हि़डीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

एका चाहत्याने सांगितले, “ही खूप निराशाजनक घटना आहे. मेस्सी फक्त १० मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मंत्री होते. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने एकही किक घेतली नाही. इतके पैसे आणि वेळ वाया गेल्या.” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले, “मेस्सीभोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते. मग आम्हाला का बोलावले? आम्ही 12,000 रुपयांचे तिकीट घेतले, पण त्याचा चेहराही नीट दिसला नाही.”

मेस्सीने साल्ट लेक स्टेडियम लवकर सोडल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर प्लास्टिकच्या बाटल्या आणि पाकिटे फेकली. तिघे खेळाडूही गर्दीमुळे थोडे अस्वस्थ दिसत होते. एका वेळी त्यांना चालण्यासही त्रास झाला. कोलकात्यातील स्टेडीयममध्ये फक्त मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तोच लवकर निघून गेल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला. प्लास्टिकच्या बाटल्या आणि पाकिटे फेकली. गर्दी इतकी प्रचंड होती की खेळाडूंना चालण्यासाठीही जागा नव्हती, ज्यामुळे मेस्सी टनेलच्या मार्गाने बाहेर पडले. त्यानंतर लगेच स्टँड्समध्ये गोंधळ सुरु झाला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...