Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, यशोमती ठाकूर, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, के. सी. पाडवी, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, विश्वजित कदम, एम.एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, रमेश बागवे, राजेंद्र मुळक, भाई जगताप, साजीद खान पठाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, वसंत पुरके, संध्या सव्वालाखे, डॉ. वजाहत मिर्झा, शिवराज मोरे, डॉ. यशपाल भिंगे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, विलास औताडे, सागर साळुंखे, राजेंद्र राख आदींना या यादीत स्थान मिळाले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...