Friday, May 17, 2024
Homeधुळेधुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार बंद

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार बंद

धुळे Dhule। प्रतिनिधी

लम्पी स्कीन डीसिज (Lumpy Skin Disease) या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये (prevalence of should not increase) म्हणून दि. 2 सप्टेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीतील (Dhule Agricultural Produce Market Committee) जनावरे बाजार बंद (Animal market) ठेवण्याचा (Decision to close) निर्णय घेण्यात आला असून गुरांची खरेदी विक्रीचे व्यापार, व्यवहारही बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरास तत्काळ लम्पी स्कीन डीसिज आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे. सर्व पशुपालक शेतकरी, गुरे व्यापारी व इतर सर्व संबंधितांनी धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल, गाय, म्हैस, रेडा विक्रीसाठी आणु नये, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक जयसिंग गिरासे यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात लम्पी स्कीन डीसिज या रोगाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी पशुपालक, सामान्य नागरिक, क्षेत्रीयस्तरावरील कार्यरत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पारोळा रोड, धुळे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लम्पी स्कीन डीसिज या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तालुका किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यात सन 2021 – 22 मध्ये धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

लम्पी स्कीन डीसिज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशींमध्ये आढळून येतो. विदेशी वंशाच्या आणि संकरित गायींमध्ये देशी वंशाच्या गायींपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक आहे. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणार्‍या मर्तुकीचे प्रमाण कमी असले, तरी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन घटते. काही वेळेस गर्भपात होवून प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.

या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधासाठी रोग प्रादुर्भावादरम्यान विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी या आजाराचा प्रसार मुख्यत्व चावणार्‍या माशा, डास, गोचीड, चिलट्यांमार्फत होत असल्याने कीटकनाशक औषधांची गोठ्यात फवारणी करावी. तसचे गावांत कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. सध्या भारतात या रोगावर खात्रीशीर आणि प्रभावशाली रोग प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र, शेळ्यांमधील देवी रोगावर वापरण्यात येणारी गोट पॉक्स ही लस वापरून हा रोग आटोक्यात आणता येवू शकतो.

प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने- आण व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचाली टाळणे आवश्यक आहे. तसेच जनावरांच्या बाजारात फक्त लसीकरण व टॅग असलेल्या जनावरांनाच प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोगप्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याबाबत व रोग प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

…तर होईल कारवाई

या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिकार नसताना लसीकरण प्रमाणपत्र निर्गमित करणे किंवा सदोष लसमात्रा टोचणार्‍या व्यक्ती, कायद्याशी सुसंगत नाही, अशी कृती करणार्‍या किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सक्षम प्राधिकार्‍यांना अडथळा आणणार्‍या व बाधित पशुधन किंवा शव नदी, तलाव, कॅनॉल व इतर पाण्याच्या स्त्रोतामध्ये टाकणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे करण्यात येईल.

लक्षणे आढळल्यास उपचार करा

लम्पी स्कीन डीसिज या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणार्‍या माशा, डास, गोचीड, चिलट्यांर्मात होतो. हा आजार झालेल्या जनावरांमध्ये डोळे व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथींना सूज येणे, भरपूर ताप येणे, दुग्धोत्पादन कमी होणे, चारा कमी खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर गाठी येतात ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात.

माहिती देणे बंधनकारक

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये धुळे जिल्ह्यातील लम्पी स्कीन डीसिजच्या रोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक व इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतींनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखास, पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या