Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात सोमवारपासून भारनियमन

नाशकात सोमवारपासून भारनियमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यभरातून वाढती विजेची (Electricity) मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा भारनियमनाचे (Load shedding) संकट आले आहे. याचा फटका नाशिककरांनाही बसणार असून, सोमवार (दि.18) पासून शहरात सुमारे तीन ते साडेतीन तासांचे भारनियमन (Load shedding) होणार आहे…

- Advertisement -

सोमवार ते बुधवार सकाळी 7.30 ते 9 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.15 पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी सकाळी 9 ते 10.45 आणि दुपारी 16.15 ते सायंकाळी 5.45 या कालावधीत पवननगर, राणेनगर, गंगाघाट, कृषीनगर, विद्याविकास सर्कल, पाटील कॉलनी, सदगुरू नगर, राजेबहाद्दर, उदोजी मराठा या भागात भारनियमन (Load shedding) होणार आहे.

सोमवार ते बुधवार सकाळी 9 ते 10.45 आणि दुपारी 16.15 ते सायंकाळी 7.15 पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी 7.30 ते 9 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.15पर्यंत अश्विन नगर, विजयनगर, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, नवीन साधुग्राम, माघ सेक्टर, चव्हाण मळा, सहदेव नगर, उंटवाडी, महात्मानगर, सावरकर नगर येथे भारनियमन (Load shedding) होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तमनगर, एकतानगर, कुलकर्णी कॉलनी, त्रिमूती चौक, पंचक, गायत्रीनगर, पंचवटी क्रीडा संकुल, टिळकवाडी या ठिकाणी सोमवार ते बुधवार सकाळी साडेसात ते साडेनऊ गुरुवार ते रविवार सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत भारनियमन (Load shedding) होणार आहे.

दुपारीदेखील दोन आणि चार वाजता दीड तासांचे भारनियमन होणार आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी चार ते सहा या वेळेत, तसेच गुरुवार ते रविवार सकाळी साडेसात ते साडेनऊ, तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत म्हसरूळ, पेठरोड, गोरक्षनगर, अशोकस्तंभ, आरटीओ, विशाल पॉईंट, एसटी कॉलनी, अमृतधाम, राममंदिर, सातपूर या ठिकाणी भारनियमन (Load shedding) होणार आहे.

शहरातील कलानगर, कालिकानगर, सिंहस्थनगर, साईनगर, रविवार कारंजा, गोविंदनगर येथे सोमवार ते बुधवार सकाळी सहा ते साडेआठ दुपारी पाऊणेदोन ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत भारनियमन होणार आहे.

गंजमाळ, लेखानगर, ठक्कर, बाजार, गोविंदनगर, मोरवाडी येथेही सकाळ सायंकाळी भारनियमन होणार आहे.सारडा सर्कल, औरंगाबाद रोड, जुने नाशिक, बुधवारपेठ, भद्रकाली मार्केट, दूधबाजार या ठिकाणी देखील सकाळ सायंकाळी तीन-तीन तासांचे भारनियमन होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या