Friday, July 24, 2026
HomeनगरAhilyanagar : कर्जमाफीमधून अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी वेगळी?

Ahilyanagar : कर्जमाफीमधून अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी वेगळी?

1 लाख 30 हजार शेतकर्‍यांना वावडे || अकोले तालुक्यात 102 टक्के काम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीचे प्रमाण 87.4 टक्क्यांवर पोहोचले असले, तरी अद्याप 1 लाख 30 हजार शेतकर्‍यांनी हे कार्ड काढलेले नाही. मध्यंतरी पोर्टलवरील अडचणी आणि प्रशासकीय मंजुरीतील विलंबा मुळे या कामाची गती मंदावली होती. त्यानंतर प्रशासनाने वेग घेतला असला, तरी जिल्ह्यातील एकूण शेतकर्‍यांपैकी जवळपास 13 टक्के शेतकर्‍यांकडे अजूनही अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नाही. परिणामी, या शेतकर्‍यांना सरकारच्या आगामी कर्जमाफीचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त होत असताना कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांची अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी सक्तीची नसल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सुत्रांकडून देण्यात आली.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात 10 लाख 24 हजार 628 शेतकरी असून, त्यापैकी 8 लाख 95 हजार 526 शेतकर्‍यांनी फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) काढला आहे. मात्र, 1 लाख 29 हजार 800 शेतकर्‍यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. तालुकानिहाय विचार केल्यास कोपरगाव, नगर आणि नेवासा तालुक्यांत केवळ 77 ते 80 टक्केच काम झाले आहे, तर उर्वरित तालुक्यांमध्ये 84 ते 98 टक्क्यांपर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, अकोले तालुक्यात 53 हजार 160 लक्ष्य असताना प्रत्यक्षात 54 हजार 542 शेतकर्‍यांची नोंदणी होऊन तब्बल 102 टक्के काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे.

तसेच कर्जमाफीसाठीही अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक असल्याचे बजावण्यात आले होते, तरीही जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार शेतकर्‍यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. गेल्या वर्षभरात अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम केवळ अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली होती. त्यामुळे ऐनवेळी जाग आलेल्या शेतकर्‍यांनी नोंदणीसाठी एकच गर्दी केल्याने मध्यंतरी महाआयटीचे पोर्टल संथ झाले होते. ही तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर आता कामाला पुन्हा गती आली आहे. गेल्या महिनाभरात नवीन कार्ड काढणार्‍यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात दररोज 250 ते 300 नवीन आयडी तयार केले जात आहेत.

दरम्यान, कर्जमाफीचे निकष जाहीर केले त्यावेळी शेतकर्‍यांना अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. मात्र, नगरसह राज्यात मोठ्या संख्याने शेतकर्‍यांची अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी शिल्लक असल्याने यंदाच्या कर्जमाफीतून अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी नसणार्‍यांना सवलत देण्याच्या सुचना असल्याचे जिल्हा बँकेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे ज्या शेतकरी कर्जमाफीत पात्र आहेत, केवळ अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी नसले तरी त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पीएम किसानच्या लाभार्थ्यांची स्थिती
फार्मर आयडी हा शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. केंद्र व राज्य शासनाचे पीक कर्ज, सबसिडी, बियाणे, खते, कृषी अवजारे आणि इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी हा आयडी बंधनकारक करण्यात आला आहे, ज्यामुळे लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मपंतप्रधान किसान सन्मान निधीफ (पीएम किसान) योजनेसाठी पात्र असणार्‍या 5 लाख 39 हजार 807 शेतकर्‍यांपैकी 4 लाख 88 हजार 190 शेतकर्‍यांनी आपली अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी पूर्ण केली आहे.

तालुकानिहाय नोंदणीची
अकोले 102.60, पाथर्डी 97.62, श्रीगोंदा 97.45, पारनेर 97.45, जामखेड 96.70, कर्जत 92.50, श्रीरामपूर 91.23, राहाता 88.88, राहुरी 83.84, संगमनेर 82.35, शेवगाव 81.99, नेवासा 80.27, नगर 78.22, कोपरगाव 77.40 टक्के नोंदणी झालेली आहे.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....