Friday, May 3, 2024
Homeनगरस्थानिक बियाण्याचे जतन होणे गरजेचे : राहिबाई पोपेरे

स्थानिक बियाण्याचे जतन होणे गरजेचे : राहिबाई पोपेरे

बाभळेश्‍वर (वार्ताहर) / Babhaleshwar कृषी क्षेत्रात कार्यरत असताना देशपातळीवर काम करता आले हा आनंद मोठा आहे. देशातील स्थानिक बियाण्याचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.

बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्रात भारतीय कृषी अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने 93 स्थापना दिनानिमित्त आयोजित किसान गोष्टी कार्यक्रमात ऑनलाईन कार्यक्रमात राहीबाई पोपेरे बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, सहायक महासंचालक डॉ. सुधीरकुमार, आदर्श गावचे पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, अटारी पुणे येथील संचालक डॉ. लखनसिंग, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, प्रयोगशील शेतकरी संपतराव वाकचौरे आदींसह देशातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

- Advertisement -

ऑनलाईन कार्यक्रमात केंद्राच्यावतीने किसान गोष्टी कार्यक्रमात बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी स्थानिक वाण, त्याचे जतन, लागवड तंत्र, औषधी गुणधर्म यावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मला मोठं काम करता आलं याचा आनंदही आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी ऑनलाईन सहभागी झालेले आदर्श गावचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी पाण्याचे महत्त्व, गावातील पाण्याची बचत, गट संघटन, पाण्याचे बजेट, हवामानातील बदल आणि त्यानुसार पाण्याचे नियोजन यावर मार्गदर्शन करतानाच गावे पाणीदार होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील दोन पद्मश्रींनी कृषी क्षेत्राला देशपातळीवर दिशादर्शक मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या