Monday, May 6, 2024
Homeजळगावआता जनावरांसाठी लॉकडाऊन!

आता जनावरांसाठी लॉकडाऊन!

धरणगाव । Dhrangaon ।

कोरोना काळात विषाणू पसरु नये म्हणून दीर्घ मुदतीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला. एकमेकांचा स्पर्श, सानिध्य वाढू नये म्हणून दुकानं, शाळा, बाजारपेठा बंद ठेवून संचारबंदी लावण्यात आली होती. तीच वेळ आता गुरांवर (cattle) आली आहे. लंपी स्किन (Lumpy skin) या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दि. 6 सप्टेंबरपासून गुरांची खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी धरणगावी भरणारा गुरांचा बाजार (Cattle market) भरणार नाही याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत, सर्व शेतकरी बंधू ,पशुधन विक्रेते, खरेदीदार यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि प्रशासक यांनी आवाहन केले आहे. पशुधनावर लंम्पी स्कीन या साथीच्या प्रसार होत असल्याने , कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव मुख्य बाजार येथे गुरुवारी व उप बाजार कासोदा येथे मंगळवारी भरणारे गुरांचे बाजार दिनांक 6/09/2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तरी कोणीही पशुधन विक्रीस आणू नये असे सूचित करण्यात आले आहे.

लंम्पी स्किनचा (Lumpy skin) प्रादुर्भाव पसरु नये व त्यामुळे रोगराई वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. शेतकर्‍यांनी आपल्या पशूधनाची योग्य ती काळजी घ्यावी. जनावर घरीच ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. हा जनावरांसाठी एक प्रकारचा लॉकडाऊनच आहे. शेतकरी, कृषीधन मालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. आज मंगळवार रोजी कासोदा येथील बाजारात कुणीही जनावरं आणू नये असे सूचित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या