Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशगोव्यात कडक लॉकडाऊनची घोषणा

गोव्यात कडक लॉकडाऊनची घोषणा

मुंबई | Mumbai

देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता करोनाची साळखी तोडण्यासाठी प्रत्येक राज्यात प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. गोवा हे कर्नाटकनंतर दुसरं भाजपशासित राज्य आहे जिथं लॉकाडाऊन करण्यात आलं आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल.

यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच, लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असंही आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

दरम्यान गोव्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना करोनाची लक्षणं जाणवत असतील त्यांनी तात्काळ उपचार सुरू करावेत असे आवाहन देखील प्रमोद सावंत यांनी केले आहे. यासाठी आरटीपीसीआर टेस्टच्या निकालाची वाट पाहत बसण्याची गरज नसल्याचं देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या