Friday, October 2, 2026
Homeक्राईमCrime News : लॉजवर नेऊन युवतीवर अत्याचार

Crime News : लॉजवर नेऊन युवतीवर अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका युवतीला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित 24 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये शुक्रवारी (8 मे) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर बाळकिसन दरेकर (रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

फिर्यादी युवती मुळची अमरावती जिल्ह्यातील असून ती सध्या शिरूर (जि. पुणे) तालुक्यात राहते. तिची मयुर दरेकर याच्यासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्याने युवतीकडे विवाहाची मागणी घातली. मात्र, युवतीने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर मयुर याने पीडितेचे फोटो समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने मयुरचे ऐकले.

मयुरने तिला अरणगाव (ता. अहिल्यानगर) परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर दरेकर याच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपअधीक्षक (अहिल्यानगर ग्रामीण) शिरीष वमने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तिसर्‍या यादीत जिल्ह्याला 63 कोटीची कर्जमाफी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर...