Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात ६२.३१ तर राज्यात ५२.४९ टक्के...

Loksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात ६२.३१ तर राज्यात ५२.४९ टक्के मतदान

मुंबई | Mumbai

देशासह महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील (Fourth Phase) मतदान (Voting) पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : राज्यात सकाळपासून चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगाव ५१.९८, रावेर ५५.३६, जालना ५८.८५, छत्रपती संभाजीनगर ५४.०२,
मावळ ४६.०३, पुणे ४४.९०,शिरूर ४३.८९, अहमदनगर ५३.२७, शिर्डी ५२.२७ आणि बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान हे नंदुरबारमध्ये आणि सर्वात कमी ४३.८९ टक्के मतदान शिरूमध्ये झाले आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : राज्यात दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी

तर देशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६२.३१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आंध्र प्रदेशात ६८.०४,बिहार ५४.१४, जम्मू-काश्मीर ३५.७५, झारखंड ६३.१४, मध्यप्रदेश ६८.०१ टक्के, महाराष्ट्र ५२.४९,ओडिशा ६२.९६, तेलंगणा ६१.१६, उत्तरप्रदेश ५६.३५ आणि पश्चिम बंगालमध्ये ७५. ६६ टक्के इतके मतदान झाले आहे. या आकडेवानुसार सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये ७५.६६ टक्के मतदान तर सर्वात कमी ३५.७५ टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. त्यामुळे आता मतदान संपेपर्यंत देशात आणि राज्यात चौथ्या टप्प्यात एकूण किती टक्के मतदान होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची सभा पिंपळगावलाच; ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन सुरु

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या