Monday, May 6, 2024
Homeधुळेप्रेम करतांना वय बघा, अन्यथा फसाल!

प्रेम करतांना वय बघा, अन्यथा फसाल!

धुळे । Dhule । प्रतिनिधी

अलिकडच्या काही वर्षात अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाणे Fleeing of minor boys and girls, प्रेम प्रकरणातून लग्न करणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र यातून त्या दोघांच्या आयुष्याचे नुकसान Loss of life तर होतेच पण दोन्ही कुटुंबांनाही Even families याचा प्रचंड त्रास Trouble होतो. यामुळे प्रेम करतांना आधी वय बघा, वयात आल्यावर भेटा, अन्यथा फसाल, असा सल्ला वजा आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डॉ. डी.यु. डोंगरे Secretary, District Legal Services Authority Dr. D.U. Ḍōṅgarē यांनी केले.

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्न श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयातील पत्रकारीता विभाग आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात न्या. डॉ. डोंगरे बोलत होते. मानवी हक्क अधिकार दिनानिमित्त प्रसार माध्यमे आणि कायदा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. मोहन पावरा, सामाजिक कार्यकर्ते आप्पा खताळ, अ‍ॅड. भावना काकडे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. अनिल चव्हाण, विधीसेवा प्राधिकरणाचे अधिव्याख्याता घन:श्याम थोरात यांची उपस्थिती होती.

न्या. डॉ. डोंगरे यांनी लोकशाहीच्या चारही स्तंभांचा उल्लेख करीत माध्यमे या चौथ्या स्तंभाचे महत्व आणि जबाबदारी स्पष्ट केली. दिवसेंदिवस माध्यमांची जबाबदारी वाढत असून समाजात जागृती निर्माण करण्याचे मोठे काम करतांनाच विश्वासार्हताही टिकवून ठेवावी लागणार आहे. कायद्या विषयी सजगता निर्माण करुन अजाणत्या वयात मुला-मुलींकडून गुन्हे घडणार नाहीत याची खबरदारी माध्यमांसह सार्‍यांनाच घ्यावी लागणार असून नव्या पिढीतील भावी पत्रकार विद्यार्थ्यांनी या दृष्टीने निश्चित विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रा.डॉ. पावरा यांनी समाजातील विविध घटकातील विषमता, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि त्यासाठी कायदा व प्रसार माध्यमांची भूमिका याबाबत मनोगत मांडले. प्रास्ताविकात प्रा. थोरात यांनी वेगवेगळ्या गाजलेल्या खटल्यांचे दाखले देवून हक्क आणि अधिकारांबाबतच्या जाणीवा विषेध केल्या तर अ‍ॅड. भावना काकडे यांनी मानवी हक्क दिन का साजरा केला जातो. याबाबत माहिती दिली. श्री. खताळ यांनीही मनोगत मांडले. तर प्रा. चव्हाण यांनी कार्यक्रमा मागील उद्देश स्पष्ट केला. सुत्रसंचालन विद्यार्थीनी धनश्री गोसावी हिने मनोगत दिया भालेराव हिने तर आभार जागृती पाटील हिने मांडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या