Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik : पंचवटीत भगवान श्रीजगन्नाथ रथयात्रा; हजारो भाविकांचा सहभाग

Nashik : पंचवटीत भगवान श्रीजगन्नाथ रथयात्रा; हजारो भाविकांचा सहभाग

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

‘श्री जगन्नाथ पुरी रथयात्रा उत्सव समिती नाशिक’च्या वतीने आयोजित रथोत्सवात पंचवटीसह शहर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदा या रथयात्रेचे तिसरे वर्ष असून, पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरुवात होऊन विविध मार्गांनी रथ मिरवणूक मार्गस्थ झाली.

YouTube video player

रथाची आकर्षक सजावट करून सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात आणण्यात आले. तेथे पूजा, आरती, शृंगार व नैवेद्य अर्पण करून विधिवत रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज, नागपूरचे मुधोजी राजे, स्वामी संविदानंद, महंत फलाहारी महाराज, महंत बालकदास, राजारामदास, बैजनाथ महाराज, रामसनेहीदास महाराज, आचार्य कालिकानंद महाराज, स्वामी रामतीर्थ महाराज, दीपक बैरागी यांसह अनेक संत-महंतांनी भगवान श्रीजगन्नाथाचे पूजन व आरती केली.

मिरवणुकीत ढोल-ताशांचे पथक, मर्दानी खेळ पथक, बँड, पाठशाळांमधील विद्यार्थी, वारकरी, कीर्तनकार, ध्वजधारक, पारंपरिक वेशभूषेतील भक्त, दिगंबर आखाडा व श्री खाकी आखाड्याचे हनुमान ध्वज निशान यांचा सहभाग होता. ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार व वेदपठण करत रथाच्या मार्गाला धार्मिक व पवित्र स्वरूप दिले.

रथ गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सीतागुंफा, काळाराम मंदिर, नागचौक, कृष्णनगर मार्गाने जात पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर येथे पोहोचला. यानंतर आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.रथयात्रेच्या मार्गावर विविध भागात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रथावर भाविकांकडून पुष्पवृष्टी करत उत्सवाचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास आयुक्त मनिषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप, पंकज भुजबळ, वसंत गिते, माजी महापौर दशरथ पाटील, सुनिल बागुल, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, अरुण पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, सचिन लाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिक बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भगवान जगन्नाथांसह स्वामिनारायण भगवंताच्या मूर्त्यांची भव्यदिव्य रथयात्रा मंदिरातील वरिष्ठ संत, तसेच कोठारी महाव्रतस्वामी, संतगण व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या रथयात्रेत नाशिकमधील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...