Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारशहादा तालुक्यात ऊसाचे नुकसान

शहादा तालुक्यात ऊसाचे नुकसान

शहादा Shahada। ता.प्र.-

तालुक्यातील पूर्व भागात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) बामखेडा शिवारात (Bamkheda Shiwar) ऊस ( Loss Sugarcane) जमिनीवर आडवा झाला. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलयुक्त शिवाराचे बंधारे (Dams of Jalyukt Shivara) प्रथमच भरले. तालुक्यात एकाच रात्रीत 384 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक 84 मिमी पाऊस वडाळी मंडळात झाला. दरम्यान, जमिनीवर आडवा झालेल्या उसाची पाहणी करून त्वरित पंचनामे (Panchnama) करावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून (Demand from farmers) होत आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरू व्हायला दोन महिने होऊनही तालुक्यात काही भागात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. श्रावणाच्या पहिला आठवडाही कोरडा गेला होता. दुसर्‍या आठवड्यातील ऑगस्ट महिन्यात प्रथमच मुसळधार पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणावर ऊस जमिनीवर आडवा पडला. त्यामुळे साहजिकच वजनात घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. आधीच खताचे भाव वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उत्पादित मालापेक्षा खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच अधूनमधून होणारी निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी भरडला जात आहे. कृषी व महसूल विभागाने शेत शिवाराची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

बंधार्‍यात प्रथमच पाणी

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात बामखेडा परिसरात प्रथमच जोरदार पाऊस आल्याने पहिल्यांदाच शेत शिवाराबाहेर पाणी पडले. जोरदार पाऊस त्यासोबतच हवा असल्याने ऊस जमिनीवर आडवा झाला. परिणामी त्या आडव्या झालेल्या ऊसात चालणेही जिकीरीचे आहे. त्यामुळे ऊंदरांचा हैदोस होईल.

परिणामी वजनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची भिती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. परिसरात जलयुक्त शिवार तसेच विविध योजनांमधून बांधलेल्या बंधार्‍यांमध्ये प्रथमच पाणी आले. शेतकरी सुखावला असला तरी दुसर्‍या बाजूला नुकसानीने गहिवरलाही आहे.

सुमारे चार एकर ऊस गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आडवा झाला. अजून तरी चार ते पाच महिने ऊस तुटणे अशक्य असल्याने नुकसानीची झळ सोसावी लागेल. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बामखेडा येथील शेतकरी राकेश पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या