मुंबई । Mumbai
आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ (LPG Price Hike) झाली आहे.
मात्र हि दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ३९ रुपयांनी वाढलेल्या आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
नवीन दरांनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १६५२.५० रुपयांवरून १६९१.५० रुपये झाली आहे. येथे सिलिंडरमागे ३९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत या १९ किलोच्या सिलेंडरची किंमत (मुंबई एलपीजी किंमत) १ सप्टेंबरपासून १६४४ रुपये झाली आहे. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७६४.५० रुपयांवरून १,८०२.५ रुपयांपर्यंत वाढली आहे.
हे ही वाचा : दहा हजार गुरूजी झेडपीवर धडकणार
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. यामुळे सप्टेंबर मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलतील असे वाटत होते. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सप्टेंबरमध्येही कायम आहेत. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजही कोणताच बदल केलेला नाही.