Sunday, July 26, 2026
HomeनगरShirdi : चंद्रग्रहणामुळे आज साई दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल

Shirdi : चंद्रग्रहणामुळे आज साई दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आज होणार्‍या खग्रास चंद्रग्रहणानिमित्त शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर आणि संस्थानच्या अखत्यारीत येणार्‍या सर्व मंदिरांच्या दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ग्रहणाच्या काळात दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 या वेळेत भाविकांसाठी दर्शन बंद राहील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. संस्थानने दिलेल्या माहितीनुसार ग्रहण काळामध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद असले, तरी मंदिर परिसरात धार्मिक मंत्रोच्चार आणि विधी सुरू राहणार आहे. ग्रहणाची मोक्षवेळ संपल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करून पुढील विधी पार पडतील.

- Advertisement -

दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 वाजेपर्यंत दर्शन बंद राहील. सायंकाळी 7 वाजता मंगलस्नान होईल. मंगलस्नानानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती आणि धुपारती संपन्न होईल. धुपारतीनंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था पूर्ववत करण्यात येईल. रात्री 10 वाजता परंपरेनुसार नियमित शेजारती होईल. चंद्रग्रहणामुळे दर्शनाच्या वेळेत हा बदल करण्यात आला असून देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी. संस्थान प्रशासनाला सहकार्य करून दर्शनाचे नियोजन करावे, असे आवाहन गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...