Wednesday, February 4, 2026
HomeनगरAkole : मधुकर तळपाडे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Akole : मधुकर तळपाडे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

अकोले |प्रतिनिधी| Akole

दोनवेळा शिवसेनेकडून (Shivsena) विधानसभेची निवडणूक लढविलेले मधुकर तळपाडे (Madhukar Talpade) यांनी रविवारी (दि.29) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला. यामुळे अकोले (Akole) तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढली आहे.

- Advertisement -

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या पक्षबांधणीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी माजी उपसभापती मारुती मेंगाळ, अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख, रामदास आंबरे, अगस्ति पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, रोहिदास भोर, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सुशांत गजे, माजी नगरसेवक सचिन शेटे, धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ, औरंगपूरचे माजी उपसरपंच प्रकाश पाचपुते, भाजप अल्पसंख्यांक सेलचे जावेद जहागिरदार, शेतकरी संघटनेचे नेते सुभाष येवले आदिंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ मधुकर तळपाडे हेही स्वगृही परतले.

YouTube video player

पोलीस अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या तळपाडे यांनी 2009 व 2014 मध्ये शिवसेनेतर्फे अकोले विधानसभेची निवडणूक लढवली होती. चांगली मते मिळूनही तिरंगी लढतीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळकटी आणणारा असा आहे.

पक्ष प्रवेशावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, डॉ. अमोल भोर, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, तालुकाप्रमुख सुशांत गजे, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, तालुका कार्याध्यक्ष जगन देशमुख, तालुका सहसचिव सुभाष येवले, महिला आघाडीच्या शर्मिला येवले, अकोले शहर कार्याध्यक्ष जावेद जहागिरदार, शहर सचिव सचिन भालेराव, गटप्रमुख प्रकाश पाचपुते आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...