Thursday, May 2, 2024
Homeजळगावजिल्ह्यात ट्रॅक्टर चोरणार्‍या मध्य प्रदेशातील संशयिताला अटक

जिल्ह्यात ट्रॅक्टर चोरणार्‍या मध्य प्रदेशातील संशयिताला अटक

जळगाव- Jalgaon

जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरणार्‍या रवी सरजू राठोड ( 26,रा. हिरापूर, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्य प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार 12 जानेवारी रोजी जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातून अटक केली. त्याने अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टर चोरल्याची कबूली दिली असून ते ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे.

- Advertisement -

या पथकाने केली अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील संशयित रवी राठोड हा जिल्ह्यात विविध ठिकाणांहून शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कर्मचारी सुनील दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन व पंकज शिंदे यांनी संशयित रवी राठोड यास 12 जानेवारी रोजी अटक केली.

पाडसे येथून ट्रॅक्टर चोरल्याची कबूली

संशयित रवी राठोड याने 15 डिसेंबर रोजी रात्री पाडसे, ता.अमळनेर येथील मधुकर नामदेव कोळी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.19 बी.जी.5482) चोरल्याची कबुली दिली असून चोरलेले ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे. संशयित रवी राठोड यास पुढील कारवाईसाठी मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या