Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसाखर आयुक्तालयाने विकसित केलेले महा-ऊस नोंदणीअ‍ॅप उपयुक्त ठरेल - सहकार मंत्री अतुल...

साखर आयुक्तालयाने विकसित केलेले महा-ऊस नोंदणीअ‍ॅप उपयुक्त ठरेल – सहकार मंत्री अतुल सावे

पुणे |प्रतिनिधी|Pune

शेतकर्‍यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले महा-ऊस नोंदणीअ‍ॅप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पुणे येथील साखर संकुल येथे साखर आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅपच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री सावे बोलत होते. याप्रसंगी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी आदी उपस्थित होते.

मंत्री सावे पुढे म्हणाले की, ऊसाचे क्षेत्र वाढत असताना या अ‍ॅपमुळे ऊस नोंदणीबाबतचा शेतकर्‍यांचा त्रास कमी होईल. ऊस हे शेतकर्‍यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. ग्रामीण भागात ऊस नोंदणीबाबत तक्रारी येतात आणि ऊसाची तोड होण्याबाबत शेतकरी चिंतेत असतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऊसाची नोंद होणार असल्याने ऊस वेळेवर तुटण्यास मदत होऊन शेतकर्‍यांचा फायदा होईल. यामध्ये एका कारखान्याव्यतिरिक्त अजून दोन कारखान्यांचा पर्याय दाखल करण्याची सोय असल्यामुळे ऊस तोडणीविषयी खात्री मिळेल, असा विश्वास मंत्री सावे यांनी व्यक्त केला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती देतांना सांगितले की, साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी करणे शक्य होत नाही असे शेतकरी या मोबाईल पमार्फत स्वत:च्या ऊस क्षेत्राची नोंद करू शकतात. तसेच ज्या शेतकर्‍यांनी साखर कारखान्यात ऊस क्षेत्र नोंद केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या पमध्ये दिसून येईल. त्यामुळे शेतकर्‍यांना घरबसल्या आपल्या ऊसाची नोंदणी करणे शक्य होणार आहे.

बैठकीस साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडुरंग शेळके, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे, संतोष पाटील यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे शेतकरी व शेती अधिकारी उपस्थित होते.

असे आहे महा-ऊस नोंदणीअ‍ॅप…

महा-ऊस नोंदणीअ‍ॅप वापरासाठी अत्यंत सुलभ असून आजपासून गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी ते डाऊनलोड करुन त्यावरुन आपल्या चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती भरावी लागेल.

पमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकर्‍याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल, या पच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खासगी असे एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकेल.

मंत्री अतुल सावे यांच्याकडून साखर आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा…

महा-ऊस नोंदणीअ‍ॅपच्या उद्घाटनानंतर झालेल्या बैठकीत मंत्री सावे यांनी साखर आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील ऊस क्षेत्र, साखरेचे गाळप, साखर कारखाने, कारखान्यांकडून सुरू करण्यात आलेले इथेनॉल प्रकल्प, आसवणी, सहवीजनिर्मिती, काँप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प, साखर कारखान्यांपुढील आव्हाने, ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी), साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी), त्यानुसार राज्यातील शेतकर्‍यांना दिलेली एफआरपीची रक्कम आदींविषयी आढावा घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या