Friday, May 3, 2024
Homeनगरमहालक्ष्मी गौरींचे भक्तिभावाने पूजन !

महालक्ष्मी गौरींचे भक्तिभावाने पूजन !

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

नेवासा शहरासह तालुक्यात प्रत्येक घराघरांतून परंपरेने चालत आलेल्या महालक्ष्मी गौरींचे भक्तिभावाने पूजन करून स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

बुधवारी दि.२६ ऑगस्ट रोजी पंचपक्वान्नाचा नैवैद्य सुवासिनींनी महालक्ष्मी गौराई मातेला अर्पण करून मनोभावे कुटुंबा समवेत आरती केली. “करोनाचे संकट लवकर जाऊ दे, सर्व जग सुखी होऊ दे” असे साकडे सुवासिनींनी यावेळी घातले.

मंगळवारी दि.२५ ऑगस्ट रोजी गौरींचे आगमन घरोघरी झाले पहिल्या दिवशी सजावट करून दुपारच्या सत्रात गौरींना भाजी भाकरीचा नैवैद्य सुवासिंनीनी अर्पण केला. तीन दिवशीय गौरी उत्सवाचा बुधवारी दुसरा दिवस होता यादिवशी घरोघरी सुवासिनींनी गोड पदार्थ बनवून महालक्ष्मी गौरीना पंचपक्वान्नाचा नैवैद्य अर्पण करून आरतीद्वारे महालक्ष्मीचे पूजन केले. यावेळी घरोघरी वातावरण मंगलमय व भक्तीपूर्ण बनले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या