Friday, May 3, 2024
Homeनगरमहांकाळ वाडगाव लिंक लाईनच्या कामास मंजुरी

महांकाळ वाडगाव लिंक लाईनच्या कामास मंजुरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महांकाळ वाडगाव, सरला, गोवर्धन या तिन्ही गावांना वैजापूर तालुक्यातील चांदेगाव सबस्टेशनवरून विद्युतपुरवठा होतो. सदर तीनही गावे एकाच फिडरवर जोडलेली असून फीडर ओव्हरलोड होत असल्याने तीनही गावांना शेती पंपासाठी दोन दिवसाआड वीजपुरवठा होत होता. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी लिंक लाईन व एक नवीन फीडरचे काम मंजूर झाले. यामुळे महांकाळ वाडगावसाठी स्वतंत्र फिडर व सरला गोवर्धन स्वतंत्र फिडरवर जोडले जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही गावांच्या शेती पंपाची विजेची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे.

- Advertisement -

मागील 10 वर्षांपासून वरील लिंक लाईनचा प्रश्न प्रलंबित होता. या कामासाठी शासनाच्या कृषी आकस्मिता निधी योजनेतून एकूण 25 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. सदरील लिंक लाईनसाठी आता निधी मंजूर होऊन कायमचा मार्गी लागला आहे. या कामासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांचे विशेष सहकार्य लाभले. औरंगाबाद महावितरण विभागाचे मुख्य अभियंता श्री. दरुले, वैजापूर महावितरणचे श्री. बडवे, चांदेगाव सबस्टेशनचे अभियंता श्री. कुलकर्णी, महांकाळ वाडगावचे श्री. वाघ व महांकाळ वाडगाव ग्रामस्थ यांनी मोलाची कामगिरी बजावली

महांकाळ वाडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल नारायण चोरमल, उपसरपंच नवनाथ वसंतराव पवार, नंदू चोरमल, लक्ष्मण दातीर, डॉ. विश्वनाथ चोरमल, नारायणराव बडाख, किशोर बडाख, पोपटभाऊ बडाख, केशव बडाख, किशोर घोगरे, शशिभाऊ वानखेडे, विठ्ठल सोमवंशी, वाल्मिक बडाख यांनी लिंकलाईनसाठी सातत्याने पाठपुरावा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या