Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कुणाला...

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) काही दिवस शिल्लक असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र, दोन्ही युती-आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharad Pawar) २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची दुसऱ्या यादीची घोषणा केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कुणाचा आहे समावेश?

या यादीनुसार, एरंडोल-सतीश अण्णा पाटील, गंगापूर-सतीश चव्हाण, शहापूर-पांडुरंग बरोरा, परांडा-राहुल मोटे, बीड-संदीप क्षीरसागर, आर्वी-मयुरा काळे,उल्हासनगर-ओमी कलानी, जुन्नर-सत्यशील शेरकर, पिंपरी चिंचवड -सुलक्षणा शीलवंत, खडकवासला -सचिन दोडके, पर्वती-अश्विनीताई कदम, अकोले -अमित भांगरे, अहिल्यानगर शहर -अभिषेक कळमकर,माळशिरस – उत्तमराव जानकर,फलटण-दीपक चव्हाण,चंदगड -नंदिनीताई भाबुळकर कुपेकर, इचलकरंजी – मदन कारंडे यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : भाजपचा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला; नाशिक पूर्वमधून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्वमधून गणेश गीते, बागलाणमधून दीपिका चव्हाण, सिन्नरतून उदय सांगळे, येवल्यातून माणिकराव शिंदे आणि दिंडोरीतून सुनिता चारोस्कर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवरील उमेदवार घोषित झाले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यमध्ये वसंत गिते विरुद्ध वसंत गिते

दरम्यान, महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी ९० जागा आल्या आहेत. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. यात काँग्रेसने आतापर्यंत ७१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ६७ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ८० उमेदवारांची घोषणा केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या