मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha Election) निकाल जाहीर होणार आहे.या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपने काल (दि.२०) रविवारी ९९ उमेदवारांची (Candidate) आपली पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज सोमवारी (दि.२१) रोजी अजित पवार गटाची आणि शिंदेंच्या शिसेनेतील यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी
मात्र, त्याआधीच काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे.यात मुख्यमंत्री शिंदेंचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येत्या २४ ॲाक्टोबर रोजी ठाणे शहरातील (Thane City) कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक ठाण्यातील रस्त्यावर गोळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार असल्याचे बोललं जात आहे.
हे देखील वाचा : शरद पवारांच्या राष्ट्र्वादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर; कोण कुठून लढणार?
दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील येत्या २८ तारखेला बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी ते मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे २४ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा