मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघ (Constituency) देखील निवडले आहेत. याबाबत आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील अधिकृत माहिती देणार आहेत. मात्र, त्याआधी जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांतून लढण्यासाठी यादी घोषित करायला सुरुवात केली असून काही मतदारसंघांची नावेही जाहीर केली आहेत.
हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
मनोज जरांगे पाटील यांनी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली. तसेह केज मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असून गेवराई आणि आष्टीबाबत चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. यासोबतच जालना जिल्ह्यातील (Jalna District) मंठा-परतूर मतदारसंघात देखील लढविण्याचे ठरवले असून आज संध्याकाळपर्यंत एकूणच किती मतदारसंघ लढवायचे आणि उमेदवार कोण असणार हे स्पष्ट करणार आहोत. तसेच सोबत असलेल्या इतर समाजासाठीही राखीव जागांवर मनोज जरांगे पाठिंबा देणार आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत
आज अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय एकत्रित चर्चा करून उमेदवार (Candidate) निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित असे समीकरण जुळेल त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये समीकरण जुळणार नाहीत, उमेदवार असणार नाहीत, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये जी भूमिका होती तीच भूमिका राहील असेही सांगितले जात आहे.
हे देखील वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडने रचला इतिहास; भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका ३-० ने जिंकली
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यासाठी अंतरवालीतील उपोषणातून महाराष्ट्राला माहिती झालेल्या मनोज जरांगे यांनी आता थेट राजकारणात एन्ट्री केल्याचं दिसतं आहे.आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण निवडणुकीत उतरणार असे त्यांनी सांगितलं होते. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आता विधानसभेला आपले उमेदवार उतरवत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो उमेदवारांच्या मुलाखती (Interview) घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्या उमेदवारांना फॉर्म भरून ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता आपण सांगू त्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आणि जो उमेदवार ठरवू त्याला मदत करायची अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा