Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे विजयी; सिद्ध पिंपरीत...

Maharashtra Assembly Election 2024 : देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे विजयी; सिद्ध पिंपरीत जंगी स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिद्ध पिंपरी वार्ताहार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे दुसऱ्यांदा विक्रमी मताने विजयी झाल्याने सिद्ध पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी 21 फुटी लांब आणि दोन फूट रुंद अशा मोठ्या फुलांच्या हाराणे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

आमदार सरोज हिरे यांनी 40364 मताने विजय मिळवून एक प्रकारे विकास कामे करून मतदारांनी त्यांना कौल दिला असल्याचे सांगितले मागील पंचवार्षिक मध्ये सुद्धा त्यांनी इतकेच विक्रमी मते मिळाली होती आज मतमोजणी सिद्ध पिंपरी येथे करण्यात आली सकाळपासूनच मतमोजणी झाल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली होती अंतिम निकाल जाहीर होताच सर्वच तयारी यांना 40,364 मते घेऊन विजय घोषित करण्यात आले.

यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते कुंदन ढिकले यांनी 21 फूट उंचीचा आणि दोन फूट रुंद असा भव्य हार बनवून एका क्रेन मध्ये हाराची व्यवस्था करण्यात आली होती तर दुसऱ्या क्रेन मध्ये पंधरा बाय पंधरा फुटाचे भव्य असे एक घड्याळ चित्र बनवण्यात आले होते या दोन्हींच्या सहाय्याने रोज त्यांना 21 फूट हार असा घालण्यात आला.

यावेळी देवळाली मतदार संघातील सर्वच गावातील हितचिंतक मतदार उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे यांनी सिद्ध पिंपरी गावाने माझ्यावर जो दाखवलेला विश्वास हा केवळ माझा विकास कामे केलेली आहे हा नसून लाडकी बहीण योजना आणि सर्वच मतदार बंधू आणि भगिनींनी सहकार्य केल्याने मला देवळाली मतदारसंघात सिद्ध पिंपरी एक नंबरची मते मिळाली असल्याने यापुढेही मी या गावाचा विकास मागील पाच वर्षात जो झाला त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात करण्याची ग्वाही देण्यात आली.

यावेळी गावातील विद्यमान सरपंच भाऊसाहेब नाना ढिकले माजी जि प सदस्य यशवंत ढिकले माजी सरपंच मधुकर ढिकले पंडितराव जाधव उत्तमराव ढिकले पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी जाधव शेतकरी संघटनेचे शंकरराव ढिकले ग्रामपंचायत सदस्य राहुल ढिकले किरण ढिकले भारतीय जनता पार्टीचे नामदेव ढिकले उत्तम ढिकले रावसाहेब ढिकले दत्तू ढिकले नामदेव ढिकले रावसाहेब ढिकले शिवाजी ढिकले भास्करराव ढिकले उत्तम राजोळे साहेबराव ढिकले तुकाराम ढिकले योगेश ढिकले अविनाश ढिकले गणेश ढिकले आदींशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी इतर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी एक हजार किलोचा गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...