Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्याच्या राजकारणात खळबळ : अपना सपना मनी… मनी! - खा.संजय राऊत यांची...

राज्याच्या राजकारणात खळबळ : अपना सपना मनी… मनी! – खा.संजय राऊत यांची ‘एक्स’ वर पोस्ट

महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी १५ कोटींचा अ‍ॅडव्हान्स देणार असल्याची केली पोस्ट

- Advertisement -

मुंबई

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत असे समजते. त्यावर अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार बंडाच्या तयारीत असून ते स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही प्रक्रिया १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या स्थापना दिनापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

संभाव्य फूट रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा...