मुंबई | Mumbai
राज्यातील विधानसभेची मुदत २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) लागणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) जोरदार तयारी सुरू आहे. पंरतु, मविआत विधानसभेची निवडणूक कुणाच्या नेतृत्त्वाखाली लढायची याबाबत तिन्ही पक्षांत अजून एकमत होतांना दिसत नाही. मात्र, अशातच आता काँग्रेसच्या (Congress) दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे यासाठी ठाकरे गट आग्रही होता. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ३ दिवसीय दिल्ली (Delhi) दौरा देखील पार पडला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना मविआचा चेहरा बनवावा असे संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने सांगत आहेत. मात्र काँग्रेसने त्यास नकार दिला. परंतु महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जो प्रचार निवडणुकीत केला जाईल त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे असावेत असे काँग्रेस नेत्यांना वाटते.
हे देखील वाचा : नवाब मलिकांची अजितदादांना साथ? एक्स पोस्टमुळे चर्चेला उधाण
त्याचसोबत महाविकास आघाडीचा एक समान जाहीरनामा (Manifesto) तयार करण्यात येत आहे. त्याची विशेष जबाबदारी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी घ्यावी. मविआच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात काँग्रेस तयार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो निवडणूक निकालानंतरच घेतला जाईल असे काँग्रेसने स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Assembly Election 2024 : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात? अजित पवारांकडून संकेत
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस नेत्यांनी काम केले होते. त्यामुळे आता प्रचारप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे. परंतु, यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली गेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यासंदर्भात उत्सुकता आहे. परंतु उद्धव ठाकरे सध्या केवळ प्रचारप्रमुख असणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहर निश्चित करण्यात येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा