Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रBJP Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची बरसात; लाडकी बहिण, शेतकरी, विद्यार्थी,...

BJP Manifesto 2024 : भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची बरसात; लाडकी बहिण, शेतकरी, विद्यार्थी, नोकरी यासह विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ (BJP election manifesto 2024) असे नाव दिले असून या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”

यावेळी बोलतांना अमित शाह यांनी भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामं केली असं सांगताना उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब तुम्ही जनतेसमोर ठेवा. आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवारच्या कामांचेही कौतुक केले.

हे देखील वाचा : नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळांचे पारडे जड

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाच्या घोषणा

१) लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्यात येतील. तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.

२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१२,००० वरून रु.१५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल.

३) प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

४) वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.

५) महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.

६) येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१० हजार विद्यावेतन देण्यात येईल.

७) राज्यातील ग्रामीण भागात ४५ हजार गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.

८) अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु. १५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.

९) वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.

१०) सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत’ व्हिजन महाराष्ट्र @ २०२९ सादर करण्यात येईल.

११) सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

१२) महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण (Innovation) संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी अधिक पावले उचलण्यात येतील.’मेक इन महाराष्ट्र’ धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.

१३) महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजधानी बनविण्यात येईल. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारे वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल.सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.

१४) नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.

१५) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येतील.

१६) शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तु व सेवा कर (SGST) अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देऊ.

१७) शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान ६ हजार भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रृंखलेची स्थापना करू.

१८) सन २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करण्यात देतील यासाठी, प्रत्येक ५०० स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक कनस्टर तयार करण्यात येईल आणि ११,००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्द्धा करण्यात येईल.

१९) अक्षय अन्न योजना’ अंतर्गत कमी उत्पय गटातील करंबांना दरमहा मोफत शिपा पुरविण्यात येतील, प्रजामध्ये तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तन, मीठ, साखर, हळद, गौहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल. –

२०) महारथी (महाराष्ट्र एडवांस रोबोटिक्स अँड ट्रेनिंग हम इनिशिएटिव्ह)- अटल टिंकरिंग लेंग्स योजना सुरू करण्यात येईल, ज्यामधून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील. –

२१) महाराष्ट्रात कौशल्य जनगणना (Skill Census) करण्यात येईल त्यायोगे उद्यीताध्या गरजेनुसार कौशल्यांच्या तुटवाद्यांचे विश्लेषण करून त्यावर आधारित उपलब्ध कुशल मनुष्यबळा उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेप्रमाणे नवीन कुराल मनुष्यबळ उपलब्धीसाठी नियोजन करता येईल.

२२) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्द्वात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून १० लाख नवीन आयोजक तयार केले जातील, या केंद्रांमध्ये को चकिंग स्पेस आणि इनक्युबेशन सुविधांचा समावेश असेल, जेने विद्यार्थी, व्यावसायिक, आणि उद्योजक एवा येऊन, नेटवर्किंग करून, नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यात येईल.

२३) अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ११५ लाख पर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येईल.

२४) ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस, एनटी. व्हीजेएनटीमधील पात्र विद्यायांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल.

२५) १८ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद युवा आरोग्य कार्ड (Youth Health Card) सुरू करण्यात येईल.

२६) बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार

२७) ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्विकारणार – आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपडी

२८) गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या