Monday, October 28, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; अजितदादांविरोधात 'हा' उमेदवार रिंगणात

मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; अजितदादांविरोधात ‘हा’ उमेदवार रिंगणात

मुंबई | Mumbai

राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे जोरदार वाहू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवार जाहीर करण्यात येत आहे. काल महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) ६५ उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Sharad Pawar NCP) ४५ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ही यादी जाहीर केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

या यादीनुसार, इस्लामपूरतून जयंत पाटील,काटोल-अनिल देशमुख, घनसावंगी -राजेश टोपे, कराड उत्तर-बाळासाहेब पाटील,मुंब्रा कळवा-जितेंद्र आव्हाड,कोरेगाव-शशिकांत शिंदे,वसमत-जयप्रकाश दांडेगावकर,जळगाव ग्रामीण-गुलाबराव देवकर,इंदापूर-हर्षवर्धन पाटील,राहुरी-प्राजक्त तनपुरे शिरूर-अशोकराव पवार,शिराळा-मानसिंगराव नाईक,विक्रमगड-सुनील भुसारा, कर्जत जामखेड-रोहित पवार, बारामती-युगेंद्र पवार, कागल-समरजित घाटगे, अहमदपूर-विनायकराव पाटील,सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे, उदगीर सुधाकर भालेराव, भोकरदन -चंद्रकांत दानवे, तुमसर-चरण वाघमारे, किनवट-प्रदीप नाईक,यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून प्रचाराचा धडाका

तसेच जिंतूर-विजय भांबळे, केज -पृथ्वीराज साठे, बेलापूर-संदीप नाईक, वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे, जामनेर- दिलीप खोडपे, मुर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे,अहेरी-भाग्यश्री अत्राम, बदनापूर- बबलू चौधरी, मुरबाड- सुभाष पवार, घाटकोपर पूर्व – राखी जाधव, आंबेगाव- देवदत्त निकम, कोपरगाव- संदीप वर्पे, शेवगाव-पाथर्डी -प्रताप ढाकणे, पारनेर- राणी लंके, आष्टी- मेहबूब शेख, करमाळा-नारायण पाटील, सोलापूर शहर उत्तर- महेश कोठे, चिपळूण- प्रशांत यादव, तासगाव-कवठेमहाकाळ रोहित आर आर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुसरी यादी कदाचित उद्या अंतिम होणार असून ती उद्या किंवा परवा घोषित होईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या