Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

मुंबई | Mumbai

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली असून निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी (दि.१८) रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती.

- Advertisement -

तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अनेक जागांवर सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुती आज उमेदवारांची (Candidate) यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी तिन्ही पक्षाचा फॉर्म्युला ठरविल्याचे बोलले जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप विधानसभेच्या जवळपास १५० ते १५५ जागा लढविणार असल्याचे समजते. तर शिंदेंच्या शिवसेनेला ८० ते ८५ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४५ ते ५० जागा मिळणार आहेत. पंरतु, कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाने उमेदवार द्यावा हा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून घ्यायला हवा, अशा सूचनाही अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिल्या आहेत.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटेना

एकीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा अजूनही सुटलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत आतापर्यंत काँग्रेस १०३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८५ जागा, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९० जागा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २७८ जागांवरील तिढा सोडविण्यात मविआला यश आल्याचा दावा करण्यात येत असून विदर्भातील १० जागांवर घोडं आडल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...