Sunday, November 24, 2024
HomeराजकीयNashik Political : "शरद पवारांचा मला आशीर्वाद..."; नरहरी झिरवाळांचे मोठे विधान

Nashik Political : “शरद पवारांचा मला आशीर्वाद…”; नरहरी झिरवाळांचे मोठे विधान

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election) रणसंग्रामाला सुरुवात झाली असून एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.२२) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आज दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वीच नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांबाबत (Sharad Pawar) मोठे विधान केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये बंडखोरी?

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले की, राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार आहे. धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी धनराज महाले यांना विनंती करणार आहे आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असा मला विश्वास आहे”, असे त्यांनी म्हटले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.

हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

तसेच मला दिंडोरीतील (Dindori) मतदार विकासाच्या मुद्द्यावर निवडून देतील. मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून १०० टक्के निवडून येणार याची मला खात्री आहे”, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) वाट्याला जाणार आहे. त्यामुळे दिंडोरीतून शरद पवार कुणाला उमेदवारी देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर धनराज महाले हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या