Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik News : आजपासून उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात; २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत

Nashik News : आजपासून उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात; २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत

जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांची माहिती

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Vidhansabha Eletion) कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik District) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी मंगळवार २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करता येणार आयोगाने दिलेल्या सूचनाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

YouTube video player

निवडणक कार्यक्रमांनुसार उमेदवारी अर्ज विक्री व स्विकृती- सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता आज मंगळवार (दि. २२) ते मंगळवार (दि. २९) दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय (Office) दाखल करता येणार आहे.नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार (दि.४) नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे.

हे देखील वाचा : Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

तसेच प्रत्यक्ष मतदान बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी स.७ ते सायं ६ वाजेपर्यंत राहणार आहे.तर मतमोजणी शनिवारी (दि. २३) करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक घोषित केल्या क्षणापासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता (Code of Counduct) लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणूका शांततेत पार पाडण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

उमेदवारीसाठीची पात्रता

उमेदवार भारतीय नागरिक असावा, वय २५ वर्षपिक्षा जास्त असावे, उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असावे. एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही, उमेदवारास मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक, तर अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा अपक्ष असल्यास एकूण १० सूचक आवश्यक आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र (एबी) नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी ३ वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....