मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपावर चर्चा सुरु असून अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. तर अद्याप काही ठिकाणी बोलणी सुरु असून येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच पक्षाचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संभाव्य ३२ उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?
महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १०० आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. पंरतु, मविआमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बहुतांश उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगितले गेले आहे.
हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार
दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप (BJP) विधानसभेच्या जवळपास १५० ते १५५ जागा लढविणार असल्याचे समजते. तर शिंदेंच्या शिवसेनेला ८० ते ८५ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४५ ते ५० जागा मिळणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे आता जागावाटपानंतरच कुणाच्या वाट्याला किती जागा येतात? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…
ठाकरे गटाच्या संभाव्य ३२ उमेदवारांची यादी
१) आदित्य ठाकरे – वरळी
२) अजय चौधरी – शिवडी(सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी – राजापूर
४) वैभव नाईक – कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत – विक्रोळी
७) सुनिल प्रभू – दिंडोशी
८) भास्कर जाधव – गुहागर
९) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल – धाराशिव
१२) संजय पोतनीस – कलिना
१३) उदयसिंह राजपूत – कन्नड
१४) राहुल पाटिल – परभणी
१५) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
१९) अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम – निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३) सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
२४) मनोहर भोईर – उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६) राजू शिंदे – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८) कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर – सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ
३०) राजन तेली – सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे – सांगोला
३२) विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा