Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

नांदगाव | संजय मोरे | Nandgaon

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhansabha Election) बिगुल वाजला असून, नांदगाव मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसच्या (Congress) प्रभावाखाली आहे. काँग्रेसने पाच वेळा प्रतिनिधित्व केले असून, मतदारसंघात शिवसेनेने (Shivsena) तीन वेळा प्रतिनिधित्व केले. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एकदा प्रतिनिधित्व केले तर भारतीय जनता पक्षाचा देखील मतदार संघात प्रभाव आहे. मतदार संघात निवडणूक प्रामुख्याने काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात चुरशीच्या लढती रंगल्या आहेत. यंदा नांदगाव मतदार संघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार असल्याचे चिन्हे दिसू येत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप; कुणाचा आहे समावेश?

नांदगाव मतदारसंघात (Nandgaon Constituency) मराठा, दलित, ओबीसी आणि मुस्लीम समाजाचे मोठे प्रमाण आहे. यामुळे निवडणूक रणनीतीत जातीय समीकरणांचे महत्त्व असते. नांदगाव विधानसभा मतदार संघात आमदार सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आ. कांदेंनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे महायुतीत हा मतदार संघ शिंदेंच्या पारड्यात जाईल हे जवळपास निश्चित आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी मतदार संघात पूर्वतयारी केली आहे. नांदगाव येथे नुकत्याच झालेल्या शिवसृष्टीच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उमेदवारी घोषित करून आमदार कांदे यांना यावेळी दुप्पट मतांनी विजयी करा, असे उपस्थितांपुढे जाहीर केले होते.

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

नांदगाव विधानसभा मतदार संघातील जवळपास सर्वच गावात झालेल्या विकासकामांमुळे मतदार विकासाला साथ देतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.महायुतीच्यादृष्टीने ही महत्त्वाची बाब आणि जमेची बाजू आहे. नांदगाव मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी चालवलेली तयारी पाहता मतदार संघात काहीतरी नांदगाव अनपेक्षित घडण्याचे संकेत मिळत आहेत. ‘समीर, पंकज आता तुम्ही मोठे झालात, तुमचे निर्णय स्वतः घ्यायला शिका’, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समीर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात दिल्याने समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याकडून मोठा राजकीय निर्णय घेतला जाण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

खासदार समीर भुजबळ हे उमेदवारी करणार असल्याची चर्चा होत आहे. माजी आमदार पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यानंतर आता मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला, असे बोलले जात होते. परंतु त्यानंतरही आता भुजबळ समर्थकांनी समीर भुजबळ हे नांदगावमधून लढणार असल्याचे सांगितले. महायुतीमध्ये (Mahayuti) नांदगावची ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार हे निश्चित असल्यामुळे आता समीर भुजबळ ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवतात याची उत्सुकता असणार आहे. या मतदार संघात पंकज भुजबळ हे दोन वेळेस निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघात चांगलेचे सक्रिय झाले आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक लढविल्यास कोणत्या पक्षाकडून ते लढणार याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत. महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे सुपुत्र गणेश धात्रक जोरदार तयारी सुरु करून नांदगाव मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून पिंजून काढला आहे. नुकतेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत उबाठा शिवसेना पक्षातर्फे उमेदवार गणेश धात्रक हे मतदार संघातून राहतील, असे सुतोवाच त्यांनी केले होते. माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांच्या कन्या व माजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

दरम्यान, मराठा समाजाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना अनेक इच्छुकांनी जरांगे-पाटील यांची भेट घेत नांदगाव तालुक्यातील काही इच्छुकांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे नांदगाव मतदार संघातून उमेदवारी करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यांनी साकोरा एका कार्यक्रमात मी माझ्या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिलेला असून, आता राजकारणात येऊन नागरिकांची सेवा करणार असल्याचे डॉ. बोरसे यांनी व्यक्त केले आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणूक होणार आहे. मतदार संघात अंतिम उमेदवारी यादी झाल्यानंतरच तिकीट कोणकोणाला मिळते यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या