Sunday, October 27, 2024
HomeराजकीयMaharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींसह 'या'...

Maharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींसह ‘या’ ४० नेत्यांच्या समावेश

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आलेय. भाजपचे बहुतांशी राज्यातील मुख्यमंत्री यांचा देखील स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राज्यातील दिग्गजांचाही समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेक दिग्गज स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

1) देवेंद्र फडणवीस

2) विनोद तावडे

3) चंद्रशेखर बावनकुळे

4) रावसाहेब दानवे

5) अशोक चव्हाण

6) उदयनराजे भोसले

7) नारायण राणे

8) पंकजा मुंडे

9) चंद्रकांत दादा पाटील

10) आशिष शेलार

11) सुधीर मुनगंटीवार

12) राधाकृष्ण विखे पाटील

13) गिरीश महाजन

14) रविंद्र चव्हाण

15) प्रवीण दरेकर

16) अमर साबळे

17) मुरलीधर मोहळ

18) अशोक नेते

19) डॉ. संजय कुटे

20) नवनीत राणा

दरम्यान या यादीत रामदास आठवले यांचे नाव नसल्याने चर्चेला पेव फुटले आहेत. त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याची नाराजी अगोदरच बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागांसाठी ते आग्रही होते. पण त्यांच्या पक्षाला जागा वाटपात स्थान देण्यात आले नाही. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात न आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या