Wednesday, October 16, 2024
HomeनाशिकHiraman Khoskar : काँग्रेसमधून हिरामण खोसकरांची हकालपट्टी; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Hiraman Khoskar : काँग्रेसमधून हिरामण खोसकरांची हकालपट्टी; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

मुंबई | Mumbai

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे (Igatpuri Assembly Constituency) काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काल (सोमवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (Ajit Pawar NCP) आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला होता. यानंतर आता काँग्रेसकडून खोसकर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जिल्हाध्यक्षांकडे पाठविले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election Date 2024 : विधानसभेचे बिगुल वाजले; एका टप्प्यात होणार मतदान

प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) आणि त्यानंतरही आपण सतत पक्षविरोधी काम केल्याची तक्रार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरता निलंबित करण्यात आले आहे, असे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या सहीने आमदार हिरामण खोसकर यांना देण्यात आले आहे. त्याबाबत नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिरिष कोतवाल (Shirish Kotwal) यांनाही कळविण्यात आले आहे.

हे देखील वाचा : आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केलेल्या आमदारांमध्ये (MLA) हिरामण खोसकर यांचे नाव होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकर यांची चलबिचल होत होती. यानंतर अखेर त्यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. त्यानंतर आज काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

हे देखील वाचा : महायुतीकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ नावांवर शिक्कामोर्तब; ‘यांना’ मिळाली संधी

काय म्हणाले होते हिरामण खोसकर?

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आमदार खोसकर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. त्यावेळी खोसकर यांनी इगतपुरी मतदारसंघातून मी काँग्रेसकडे उमेदवारी मागत असून वारंवार जात आहे. पण, काँग्रेसवाले अजूनही माझी उमेदवारी जाहीर करत नाही किंवा मला शब्द देत नाही. म्हणून साहेबांना (शरद पवार) विनंती करायला आलो की, मागे जे काही क्रॉस व्होटिंग झाले, ते मी केले नाही. तरी पण माझ्यावर ठपका ठेवला आहे. मी शंभर टक्के मिलिंद नार्वेकरांना मतदान केलं आहे. तेच साहेबांना (शरद पवार) सांगायला आलो की, मला काँग्रेसकडून उमेदवारी द्या असं त्यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -

ताज्या बातम्या