मुंबई
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाली आहे. ते मुंबईतल्या घरीच क्वॉरंटाइन झाले आहेत
- Advertisement -
राज्याचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ही टि्वट करुन ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे मला अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे मी माझी करोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये.