Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला, आमदारांच्या घरांची तोडफोड

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला, आमदारांच्या घरांची तोडफोड

मणिपूर । Manipur

मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जात (Manipur violence) असल्याचं दिसत आहे. सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला करत तोडफोड करण्यात आली. याशिवाय ७ आमदारांच्या घरांवरही हल्ला केला गेला. यानंतर राज्य सरकारने (House Burnt Of CM Son In Law) पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली. तर काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

काय आहे प्रकरण?

नदीजवळून सापडलेल्या सहा मृतदेहांमध्ये आठ महिन्यांच्या अर्भकाचाही समावेश आहे. वास्तविक, मेईतेई समुदायाचे हे सर्व लोक सोमवारी निर्वासित छावणीतून बेपत्ता झाले होते. जिरीबाममधील बोकोबेरा येथून कुकी-जो अतिरेक्यांनी कथितपणे त्यांचे अपहरण केले होते जेव्हा सीआरपीएफची कुकी तरुणांच्या दुसऱ्या गटाशी चकमक सुरू होती. या चकमकीत ११ संशयित अतिरेकी मारले गेले. अतिरेक्यांनी पोलीस ठाण्याजवळील मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय ...

0
नवी दिल्ली | New Delhi गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) नऊ पैकी सहा...