Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : म्हेळूस्के परिसराचा पाणी प्रश्न सोडवल्याने शेतकर्‍यांचा झिरवाळांना पाठिंबा

Nashik Political : म्हेळूस्के परिसराचा पाणी प्रश्न सोडवल्याने शेतकर्‍यांचा झिरवाळांना पाठिंबा

ओझे । वार्ताहर | Oze

कडक उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी होत असतांना कायमच कादवा नदीत सतत पाणी सोडण्याची मागणी माझ्याकडे होत असतांना माझ्या लक्षात असे आले की, कादवा नदीवर एखादी पाणी वापर संस्था स्थापन झाली पाहिजे, यासाठी मला म्हेळूस्के गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करुन त्यांच्या गावात पाणी वापर संस्था पहिल्यांदा कादवा नदीवर स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून आता कादवा नदीत तसेच कादवा काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी केले.

- Advertisement -

महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांचा दिंडोरी तालुक्यात प्रचार दौरा महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या उपस्थितीत पार पडला. म्हेळूस्के येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत झिरवाळ बोलत होते. यावेळी वलखेड, कादवा म्हाळूंगी, म्हेळूस्के, ओझे, करंजवण, खेडले, पिंपरखेड, दहिवी, काजीमाळे, फोफशी, वागळूद, दहेगाव, लखमापूर, परमोरी, ओझरखेड आदी गावात प्रचार दौरा संपन्न झाला. या गावातील मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

ना.नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले की, सध्या तालुक्यातील धरणे जरी 100 टक्के भरत असले तरी धरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत आहे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करुन धरणांतील गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याचे धोरण पुढील काळात राबविण्यात येणार आहे. तसेच भविष्यात कादवा नदी कोरडी होत असल्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर आदी गावातील शेतकर्‍यांनी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे यावे.

यासाठी सर्वापरीने माझ्याकडून मदत करण्यात येईल व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात येईल.अनेक वेळा ओझे, म्हेळूस्के, करंजवण, लखमापूर, अवनखेड येथील शेतकरी वर्गाने पाण्याची मागणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात त्यांच्या मागणीची माझ्याकडून दखल घेण्यात आलेली आहे, ही बाब सर्व गावातील ग्रामस्थांना माहित आहे. सध्या विरोधकांजवळ कुठलाही मुद्दा नसल्याने माझ्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अतिशय खालच्या थराचे आरोप केले जात आहे. त्यांना माहित आहे की, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ते करु शकत नाही.त्यामुळे प्रचाराच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला जात आहे.

मात्र प्रत्यक्ष जनतेमध्ये गेल्यानंतर माझ्या विकासकामांची पावती मला प्रत्येक गावामधून होणार्‍या गर्दीतून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्या तालुक्याला नाशिक जवळील म्हसरुळपासून वीज पुरवठा केला जातो. यासाठी आपण दिंडोरी तालुक्यातील देवसाने येथे 200 के.व्ही. चे सबस्टेशन स्थापन केल्यामुळे व ते चालू झाल्यानंतर पुढील 50 वर्ष तरी विजेचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. यासाठी तालुक्यात छोटीछोटी सबस्टेशनला सरकारकडून मी मंजूरी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील जनतेला विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्त्यांबाबत जनतेची मागणी असतांना अनेक रस्ते पूर्ण झाली असून राहिलेले रस्ते लवकरच सुरु होणार आहे.

आपला दिंडोरी तालुका सदन तसेच तालुक्यात लहानमोठी सहा ते सात धरणे असल्यामुळे आपल्या परिसरात बारमाही शेती केली जाते. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतील जाळे हळूहळू तालुक्यात निर्माण होत असल्यामुळे रस्त्यांबाबत सध्या कॉक्रीटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. कारण तालुक्यात होणारी अवजड वाहनांची वाहतूक असल्यामुळे रस्ता कॉक्राटीकरण हाच पुढील काळात आपल्या समोर ध्येय आहे. त्यामुळे रस्ते सुस्थितीत राहण्यास मदत होईल. यासाठी तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी रस्ता कॉक्रीटीकरणाचे प्रयोग आपण केले असून जनतेकडून या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. या रस्त्यांमुळे काळ्या जमिनीत सतत रस्ता खराब होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.अनेक वेळा ऊसाची वाहतूक तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे रस्ता खचला जातो. मात्र या कॉक्रीटीकरणामुळे वारंवार रस्ता दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही, शेवटी ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे यांनी ओझे येथे गावाच्या एकजुठीचा उल्लेख करुन मागील काळातील घटनांना उजाळा दिला.

यावेळी प्रत्येक गावात ना. नरहरी झिरवाळ यांचे आगमण होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतशबाजी करुन ‘झिरवाळ साहेब आगे बेढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत होते. यावेळी ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी ना. झिरवाळांचे औक्षण करुन साहेब आमचा पाठिंबा तुम्हालाच असल्याचे आदिवासी महिला वर्गांनी सांंगितले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवती, युवक, वयोवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक नेते बर्डे यांच्याकडून ना. झिरवाळांच्या कामाचे कौतुक

ओझे । म्हेळूस्के येथे युवक नेते सचिन बर्डे यांनी ना. नरहरी झिरवाळ यांच्या कामाचे कौतुक केले. प्रत्येक कौतुकांच्या वेळी ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून दाद दिली. सचिन बर्डे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ना. झिरवाळ आशिर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आले आहे. आम्ही झिरवाळांकडे मी कधीच खडी व डांबर, मुरुम मागायला गेलो नाही. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ झिरवाळ साहेबांकडे पाण्यासाठी जायचो. करंजवण डॅम गाव व अवनखेड या गावच्या मध्ये असलेल्या म्हेळूस्के गावाला शेतीसाठी पाण्याचं आरक्षण पहिल पडलं. त्यासाठी झिरवाळ साहेबांनी सहकार्य केले. त्यामुळे म्हेळूस्के गावाने त्यांचा सत्कार केला. या कामाचे श्रेय साहेबांना गेले पाहिजे. गावच्या वतीने आम्ही तुम्हाला मतदान देवू, असे युवक नेते सचिन बर्डे यांनी सांगताच म्हेळूस्के ग्रामस्थांनी टाळ्याचा प्रचंड कडकडाट केला.

म्हेळूस्केला सभागृह तुडूंब; घड्याळाला प्रतिसाद

ओझे । ऊस उत्पादक कार्य क्षेत्र असलेल्या म्हेळूस्के गावात ना. नरहरी झिरवाळ यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथील मारुती मंदिरात ना. झिरवाळांच्या सभेला ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासून आतुरतेने झिरवाळ साहेब कधी गावात येतील, याची वाट ग्रामस्थ पाहत होते. झिरवाळ साहेबांचे आगमण होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. ना. झिरवाळ यांच्या सभेला सभागृह तुडूंब भरले. महायुती सरकारने म्हेळूस्के, कादवा म्हाळूंगी परिसरात प्रचंड विकासकामे केली. त्याच्या मोबदला नक्कीच नरहरी झिरवाळ यांना विजयी करुन परत देवू असे अनेक ग्रामस्थांनी ना. झिरवाळ यांना सभासंपल्यानंतर सांगितले. त्यामुळे ना. झिरवाळांच्या पाठीशी म्हेळूस्के, कादवा म्हाळूंगी परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात राहील, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. म्हेळूस्के येथे ना.झिरवाळ यांनी अतिशय संवेदनशील प्रश्न असणार्‍या पाणी वापर संस्थेचा प्रश्न मार्गी लावून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पाणी वापर संस्थेची मंजूरी मिळवून दिल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ना. झिरवाळांविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे. कारण अनेक वर्ष प्रलंबित असलेला पाणी वापर संस्थेचा प्रश्न ना. झिरवाळांच्या माध्यमातून सोडविण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...