नागपूर | Nagpur
राज्य विधिमंडळाचे नागपूर (Nagpur) येथे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु, असून आज (शनिवार) अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होत आहे. गेल्या तीन अधिवेशनांपासून राज्यात विरोधी पक्षनेता नेमला जात नसल्याने महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) महायुती सरकारवर घणाघाती टीका केली जात आहे. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) सरकारला घरचा आहेर देतांना बघायला मिळत आहे.
मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांना मानधन वेळेवर दिले जात नाही. समायोजन कधी करणार? नावाप्रमाणे समस्येचा जो अंधार झालाय, त्याला मंत्री प्रकाश अबिटकर (Minister Prakash Abitkar) न्याय देतील का? असा प्रश्न विचारला. त्यावर या प्रश्नावर मार्ग काढला असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होतील, असे उत्तर मुनगंटीवार यांना देण्यात आले.
यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी ५२ हजार समुदाय संसाधन व्यक्ती, जीवन ज्योती कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असल्याचे सांगितले. त्यावर मंत्री जयकुमार गोरे (Minister Jaykumar Gore) यांनी समुदाय संसाधन कर्मचाऱ्याला ओळखपत्र देणार, असे उत्तर दिले. यावर सरकार भाजपचं (BJP) अन् उत्तर काँग्रेसचं, चॅसी भाजपची आणि इंजिन काँग्रेसचं, असा निशाणा मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारवर साधला.
तसेच सरकार आपलं आहे. जे दीन दलित रंजल्या गांजल्यांसाठी काम करतं. पण मंत्री गोरे यांनी दिलेले उत्तर काँग्रेसचे आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर गोरे यांनी मुनगंटीवार सभागृहातील ज्येष्ठ नेते पण काँग्रेसचं (Congress) उत्तर, भाजपचं उत्तर हा प्रश्न नाही. त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो, असे म्हणत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, काल (शुक्रवारी) मुनगंटीवारांनी अजित पवारांकडून (Ajit Pawar) २०० कोटीची घोषणा करण्यात आली. मात्र, फक्त ३० कोटी देण्यात आले. त्यामुळे शासन गंभीर नसल्याची टीका केली होती. मुनगंटीवर हे भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री म्हणून काम बघितले आहे. मात्र, त्यांना महायुती सरकारमध्ये संधी मिळालेली नाही. सध्या ते सत्ताधारी बाकावर असले तरी त्यांचा हा पवित्रा सत्ताधाऱ्यांना फैलावर घेणारा आहे.




