Wednesday, June 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : माळीवाडा परिसरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Ahilyanagar : माळीवाडा परिसरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील माळीवाडा वेशीच्या आत असलेल्या हॉटेल साकळाईच्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी संशयित संदिप राजू सकट (वय 38, रा. केतकी, भिंगार) याला ताब्यात घेतले असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

संदीप सकट हा हॉटेलच्या रूममध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेत होता. या बदल्यात तो पुरुष ग्राहकांकडून पैसे उकळून स्वतःची उपजीविका भागवत असल्याची खात्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि आक्षेपार्ह साहित्य मिळून आले.

आरोपीकडून 1720 रुपये रोख आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. संदिप सकट याच्यावर अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार – वनमंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यात वन्याप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल,...