Friday, October 23, 2026
Homeक्राईमकॅफे हाऊसमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कॅफे हाऊसमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोबाईलवर मेसेज पाठवून धमकी देऊन 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने सावेडीतील एका कॅफे हाऊसमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. ही घटना 7 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम फकिरमहंमद सय्यद (वय 27, रा. केडगाव वेशीजवळ, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 6 रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी घरी अभ्यास करत असताना आरोपीने मोबाईलवर मेसेज करून धमकी दिली, तुला यावेच लागेल, नाहीतर बघ मी काय करतो? धमकीमुळे फिर्यादी घाबरून गेली आणि हो म्हणाली. त्यानंतर 7 रोजी सकाळी साडेअकराच्या फिर्यादी आरोपीला भेटण्यासाठी त्याच्या अस्लम मोबाईल अ‍ॅॅण्ड रिपेअरिंग शॉपी दुकानाजवळ गेली असता, आरोपीने फिर्यादीला 20 रुपये दिले आणि म्हणाला, तू रिक्षाने कायनेटीक चौक येथे जाऊन थांब मी तेथे लगेच येतो.

त्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपी हा त्याची मोपेड दुचाकी घेऊन कायनेटीक चौक येथे आला. फिर्यादीला त्याच्या मोपेडवर बसवून सावेडीतील एका कॅफे हाऊस येथे फिर्यादीची इच्छा नसताना घेऊन गेला. तेथे त्याने फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि विकास काळे करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...