Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Budget 2026 : शेतकरी, महिला, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या 'या'...

Maharashtra Budget 2026 : शेतकरी, महिला, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुबंई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी दोन लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश, चार नव्या योजनांची घोषणा, त्र्यंबकेश्वरसह पाच ज्योतिर्लिंगांसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुढील आर्थिक वर्षातही सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांनी लाडक्या बहि‍णींचे अनुदान १५०० रुपयांवरुन २१०० रुपये कधी करणार असे विचारले असता त्यावर फडणवीस यांनी “काळजी करु नका तुमच्या मनातील गोष्टी आम्हीच पूर्ण करणार. वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, फक्त कोर्टात जाऊ नका, अशी टिप्पणी केली. याशिवाय राज्यात सध्याच्या घडीला ३७ लाख लखपती दीदी असून आणखी २५ लाख बहि‍णींना लखपती करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पर्यटन क्षेत्राचा विकास

निवडक ५० पर्यटन स्थळांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासोबतच वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे. राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल, चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, ५ ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहेत, त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

शेतकरी, महिला, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा खालीलप्रमाणे

काँक्रिट रस्ते : राज्यातील १ हजार गावांना काँक्रिट रस्त्याने जोडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : या योजनेच्या टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमीचे रस्ते तसेच पुलांची कामे हाती घेतली जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

महाविस्तार एआय : ३० लाख शेतकऱ्यांना ‘महाविस्तार’ या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल.

वसुधा मेसेज सेवा : ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी ‘वसुधा’ ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर मिळेल.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना : या योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे.

महिला शेतकरी सक्षमीकरण : महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

डिजिटल सेवा विस्तार : शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री बळीराजा योजना : मुख्यमंत्री बळीराजा योजना २०२७ मध्येही सुरू राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...