सिन्नर | प्रतिनिधी Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज नागपूरच्या राज भवनात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज नागपूरच्या राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना रविवारी सकाळी मंत्रीपदासंबंधी फोन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार माणिकराव शिवाजीराव कोकाटे मंत्री होणार आहेत.हे निश्चित झाले होते. त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहेत . सिन्नर शहरात कालच काही बॅनर लावल्याने सर्वांच्या नजरा आता सिन्नर तालुक्याला मंत्रीपद मिळणार या कडे सिन्नर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून होते.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक नोंदवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कोट्यातून त्यांचे संभाव्य नाव मंत्री पदासाठी होते तसेच नुकतेच काही दिवसांवर ते जवळपास निश्चित होते. त्यातच निवडणूक होण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सिन्नर दौऱ्यावर आले असता पूर्व भागाच्या देवनदी पुरचारी प्रकल्पाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माणिकराव कोकाटे यांना महत्त्वाचे पद यांना नक्कीच देईल असे कार्यक्रमात दरम्यान सांगितले होते. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षात आपली वेगळी छापून ठेवली होती.
विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे शिवसेने कडून दोनदा तर काँग्रेसकडून एकदा तर राष्ट्रवादीकडून दोन वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विधानसभेच्या मतदारसंघातून शिवसेनेमधून आमदार म्हणून विधानसभेत एन्ट्री केली होती. त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवित प्रसंगी जन-सामान्यांसाठी रस्त्यावरील लढाई लढली होती. विविध प्रकल्प सिन्नर तालुक्यात आणून त्यांनी तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले होते.
शेकडो कार्यकर्ते नागपूरमधये
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते सिन्नर तसेच नाशिक जिल्ह्यातून दाखल झाले होते. यात त्यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल झाल्या होत्या.
सिन्नर तालुक्याला लाभलेले मंत्री पदाचा दुसऱ्यांदा बहुमान
तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी युती शासनाच्या काळात 1995 ते 1999 या काळात उर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद भूषविले. उर्जा, ग्रामविकास मंत्री, राज्य त्यांच्याकडे पद होते.त्यानंतर दुसऱ्यांदा तालुक्याला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने मंत्रीपदाचा मान मिळाला आहे.